सकल मराठा समाज मंडळ खांदा कॉलनी यांच्यावतीने भव्य क्रिकेट स्पर्धा मराठा चषक २०२३ चे आयोजन महात्मा शाळा मैदान खांदा कॉलनी येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत साई इलेव्हन विरुद्ध साईराज बी या दोन संघामध्ये रंगलेल्या अंतिम रोमहर्षक लढतीत साई इलेव्हन संघ विजयी ठरला. विजेत्या संघास सकल मराठा समाज खांदा कॉलनीचे सचिव व शिवसेना खांदा वसाहत शहर प्रमुख सदानंद शिर्के यांच्याहस्ते १५ हजार रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी खांदाकॉलनीसह पनवेल, नवीन पनवेल, कामोठे, कळंबोली, खारघर मधील क्रीडा प्रेमी उपस्थित होते. स्पर्धेचे आभारप्रदर्शन आयोजक संतोष जाधव यांनी केले.