मराठा समाज बांधवांसाठी असणाऱ्या शासकीय योजना यांची माहिती समाज बांधवांना देण्यासाठी व समाजाला भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेऊन त्या तात्काळ सोडविण्यासाठी समाज बांधवांच्या सहकार्याने मराठा समाज संपर्क कार्यालयाची उभारणी सकल मराठा समाज मंडळ खांदा कॉलनी यांनी केली आहे. या संपर्क कार्यालयाचे उदघाटन काल रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर खांदा कॉलनी मधील मराठा समाज बांधवांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.