• smskhandacolony@gmail.com
  • ९८६९८०१०१६
News Photo

मुंबई दिंडी - नियोजन बैठक

आम्ही आहोत,तुम्ही पण या...!

खांदाकॉलनी - नवीन पनवेल मधील समस्त मराठा बांधवाना कळविण्यात येते कि, मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आणी असंख्य मराठा आंदोलनकर्ते २५ जानेवारी २०२४ रोजी सकाळी लोणावळ्या मधून ८:०० वा निघून पनवेल च्या ऐतिहासिक भूमीत दाखल होणार आहेत.
या दरम्यान आंदोलनात सहभागी असणाऱ्या आपल्या समस्त मराठा बांधवांचे दुपारचे अन्न - पाणी (जेवणाची ) व्यवस्था करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी सकल मराठा समाज रायगड, पनवेल महानगर च्या संपूर्ण टीम वर असणार आहे. या कामी जेवणाचे व्यवस्थापन करण्यासाठी आपणास मराठा युवक, पुरुष, महिला, स्वयंसेवक यांची मोठी टीम आपल्याला उभी करावी लागणार आहे.
लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणारे आपल्या बांधवांची अन्नव्यवस्था करणे इथल्या प्रत्येक मराठ्याचे कर्तव्य असल्या कारणाने  सकल मराठा समाज खांदाकॉलनीमधील प्रत्येक मराठा बांधव आपले रोजचे दिनकार्य एक दिवस बाजूला ठेवून  दिनांक २५ जानेवारी २०२४ ह्या दिवशी स्वयंसेवक बनून आपल्या मराठा बांधवांच्या सेवेशी अर्पण करत "समाज कर्तव्य" दिन म्हणून साजरा करणार आहे.
या पवित्र कार्यात समाज कर्तव्य बजावण्यासाठी योग्य ते नियोजन करण्यासाठी सकल मराठा समाज खांदा कॉलनी च्या समाज बांधवाची " नियोजन बैठक आयोजित केली आहे. तरी खांदाकॉलनी - नवीन पनवेल मधील आपण सर्व समाज बांधवानी या बैठकीस आवर्जून उपस्थित राहावे व समाज कर्तव्य बजवावे ही आग्रहाची विनंती !!!

         

Share This News

Comment

उठ मराठा जागा हो , सकल मराठा समाज मंडळ खांदाकॉलनीचा धागा हो !