सकल मराठा समाज मंडळ, खांदा कॉलनी
भव्य रक्तदान शिबिर – २०२५
सन्माननीय रक्तदाते,
आपल्या अमूल्य योगदानामुळे आजच्या भव्य रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला व ६८ रक्तदात्यांनी रक्तदान केले . रक्तदान हेच श्रेष्ठ दान या विचाराने प्रेरित होऊन आपण दिलेले रक्त अनेक गरजूंच्या जीवाला संजीवनी देणार आहे.
आपल्या उदार मनाची आणि समाजप्रेमाची ही भावना वाखाणण्याजोगी आहे. आपल्या या योगदानाबद्दल सकल मराठा समाज मंडळ, खांदा कॉलनी तर्फे मनःपूर्वक अभिनंदन व आभार!
आपली ही सेवाभावी वृत्ती असेच कायम राहो आणि भविष्यातही आपण अशाgh सामाजिक कार्यात पुढे राहाल, हीच अपेक्षा.
सकल मराठा समाज मंडळ, खांदा कॉलनी
Share This News