सकल मराठा समाज मंडळ, खांदा कॉलनी यांच्या वतीने आयोजित हळदी-कुंकू समारंभ आणि विशेष होम मिनिस्टर स्पर्धेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आनंद वाटतो. या कार्यक्रमात व्हाईट लोटस इंटरनॅशनल हॉस्पिटलच्या डॉ. पटेल यांनी महिलांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन करून मोलाचे योगदान दिले.
याशिवाय, चंदूकाका सराफ प्रायव्हेट लिमिटेड यांनी या कार्यक्रमातील सर्व बक्षिसे प्रायोजित करून कार्यक्रमाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली.
खांदा कॉलनीतील सर्व माता-भगिनींनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्साहात सहभाग नोंदवला, याबद्दल आपणा सर्वांचे सकल मराठा समाज मंडळ, खांदा कॉलनी तर्फे मनःपूर्वक आभार!
आपल्या सहकार्यामुळेच असे उपक्रम यशस्वी होत आहेत आणि भविष्यातही आपण असेच प्रेम आणि पाठिंबा द्याल, हीच अपेक्षा!
Share This News