• smskhandacolony@gmail.com
  • ९८६९८०१०१६
News Photo

सकल मराठा समाज मंडळ, खांदा कॉलनीतर्फे शिवजयंती उत्सव उत्साहात संपन्न

सकल मराठा समाज मंडळ, खांदा कॉलनी आयोजित शिवजयंती उत्सव २०२५ मोठ्या आनंदात आणि उत्साहात संपत्र झाला. पाच दिवस चाललेल्या या उत्सवात विविध सामाजिक, सांस्कृतिक व कला उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उत्सवाची सुरुवात महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाने झाली. या समारंभात व्हाईट लोटस इंटरनॅशनल हॉस्पिटल, खारपरख्या डॉ. नैना पटेल यांनी महिलांच्या आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.

नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात वाईट लोटस इंटरनॅशनल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सेवा दिली, त्याचबरोबर कच्छ युवक संघ, पनवेल यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये 68 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक योगदान दिले. सायंकाळी महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपणारा पोवाडा व मराठी गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. रायगड भूषण शिवभूषण वैभव घरत यांनी आपल्या दमदार आवाजात पोवाडे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्याचवेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी या सांस्कृतिक कार्यक्रमाला भेट दिली.

जयता

सलग चौथ्यांदा निवडून आल्याबद्दल त्यांचा भव्य नागरी सत्कार मंडळातर्फे करण्यात आला. मुलांच्या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

या स्पर्धेत खांदा कॉलनीतील १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेऊन आपल्या कलेच्या माध्यमातून इतिहास जिवंत केला. त्यानंतर, भव्य वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या

स्पर्धेत खांदा कॉलनीसह पनवेल परिसरातील अनेक विद्याथ्यांनी सहभाग नोंदवत आपल्या भाषणातून शिवकालीन शौर्य जागृत केले. खांदेश्वर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढाकणे मॅडम व माजी सैनिक प्रदीप डावकर यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली. यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक

बबन पाटील यांनी सायबर सुरक्षा या विषयावर उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. सकाळी ११ वाजता श्रीहरी भजन मंडळ, सखांदा कॉलनी यांनी भक्तीमय भजन सेवा दिली, तर सायंकाळी चार वाजता श्री जनाई महिला भजन मंडळाने हरिपाठ सेवा सादर केली. सायंकाळी सहा वाजता भव्य दिव्य मिरवणुकीला सुरुवात झाली. मावळचा सुप्रसिद्ध श्री भैरवनाथ मित्र मंडळाच्या डोल-ताशा पथकाने मिरवणुकीला उत्साह दिला. त्याचबरोबर आद्य क्रांतिवीर बासुदेव बळवंत फडके विद्यालयाचे लेझीम पथक विशेष आकर्षण ठरते. पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने नागरिकांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. रात्री 9 वाजता चित्रकला व वकृत्व स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

मंडळाचे सल्लागार उद्योजक श्री ओंकार गावडे यांनी उपस्थित नागरिकांना व महिलांना सकल मराठा समाज मंडळाचे सदस्यत्व स्वीकारण्याचे आवाहन केले. मंडळाचे अध्यक्ष संतोष जाधव यांनी मंडळाच्या सुरू असलेल्या सामाजिक कार्याची माहिती उपस्थितांना दिली. शेवटी सचिव सदानंद शिर्के यांनी शिवजयंती उत्सव २०२५ साठो योगदान दिलेल्या सर्व बांधवांचे, देणगीदारांचे व प्रशासनाचे आभार मानून उत्सवाची सांगता केली.

Share This News

Comment

उठ मराठा जागा हो , सकल मराठा समाज मंडळ खांदाकॉलनीचा धागा हो !