• smskhandacolony@gmail.com
  • ९८६९८०१०१६
News Photo

सकल मराठा समाजतर्फे चौथा वर्धापनदिन होणार संपन्न

दैनिक युवक आधार
पनवेल, वार्ताहर

सकल मराठा समाज मंडळ खांदा वसाहत यांच्यातर्फे चौथा वर्धापनदिन रविवार दि. ९ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. संस्थेच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे संत जनाई महिला भजन मंडळाचे भजन संध्या आयोजित करण्यात आली आहे. तसेच स्नेह मेळावा व संस्थेच्या वेबसाईटचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. त्याचप्रमाणे मराठा भूषण पुरस्कार हा गौरवमूर्ती उद्योजक रामचंद्र ढोबळे यांना यावेळी देण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम खांदा वसाहतीमधील सेक्टर १ मराठा भवन येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या वतीने संतोष जाधव यांनी दिली आहे.

 

Share This News

Comment

उठ मराठा जागा हो , सकल मराठा समाज मंडळ खांदाकॉलनीचा धागा हो !