• smskhandacolony@gmail.com
  • ९८६९८०१०१६

Event Start Date

October 16, 2023

Event End Date

October 16, 2023

संपर्क

अंतरवाली सराटी

मराठा क्रांतीसुर्य मनोज जरांगे पाटील लवकरच पनवेलला, मराठा बांधवानी केली विनंती.

पनवेलमधील मराठा बांधव मराठा क्रांतीसुर्य मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला पनवेलला येण्याची केली विनंती. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे व मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे म्हणून मराठा क्रांतिकारक, मराठा संघर्ष योद्धा, मराठ्यांचा क्रांतीसूर्य मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनाला समर्थपणे साथ देऊन गरजवंत मराठ्यांच्या विराट सभेला दिनांक १४ ऑक्टोबर २०२३ रोजी सकल मराठा समाज मंडळ खांदा कॉलनीच्या समाज बांधवांनी जातीने उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला. सभेनंतर मराठा आरक्षणाला व समस्त मराठा समाजाला दिशा देत सरकारला गुढघ्यावर बसवत मराठ्यांच्या पदरात आरक्षण देऊ करणारी क्रांतिकारी भूमी ठरणाऱ्या अंतरवाली सराटी या भूमीत जाऊन उपोषण स्थळी बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली व त्यांच्या लढ्याला पाठींबा दर्शवत स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड जिल्ह्यातील पनवेल नगरीत येण्याचे आवाहन सकल मराठा समाज मंडळ खांदा कॉलनी मार्फत श्री संतोष जाधव यांनी केले. या प्रसंगी मराठ्यांच्या या विराट सभेला सचिन जाधव , सुनील औटी, राजू डेरे, सुहास महाडीक, रामचंद्र पाटील, श्री रावसाहेब देवकर , श्री मारुती पवार , श्री राहुल लालगे , श्री भरत पाटील , रवींद्र सावंत , जितेंद्र नलावडे , सागर परभणे, देवराम ठोंबरे, दत्ता शिंदे, हनुमंत भवर आदी मराठा समाज बांधव उपस्थित होते.

Event Location Map

Share This Event

उठ मराठा जागा हो , सकल मराठा समाज मंडळ खांदाकॉलनीचा धागा हो !